Saturday, February 18, 2012

Flowers composition


Flowers composition


Flowers composition






काळाचे सोबत स्वार्थाला घाला आवर, आपलेपणाची त्यावर लावा मोहर !


                         संध्या छाया भिवविती  हृदया ,हे अगदी  खरे आहे!. सर्वाना एकटे जगणे सुसह्य होत नाही! स्वतः होवून गृहस्थाश्रम संपल्यावर संसार त्याग करणे वेगळे व त्यांच्यावर बळजबरीने एकटेपणा लादणे वेगळे. एकटे राहणारे व शारीरिक व्याधींनी ग्रस्त लोक एकत्र राहण्यात खरे तर कोणाची हरकत नसावीच! जे हरकत घेतात किंव्हा चर्चा करतात, किंव्हा सहानुभूती दाखवतात ,ते प्रत्यक्षपणे त्यांना काही मदत करू शकत नसतात. त्यामुळे काळा सोबत ज्यांना जगण्यासाठी योग्य पर्याय वाटतील ते ,ते करीत राहतील. याचे परिणाम माणसावर  व कुटुंब  व्यवस्थेवर निश्चित होणार! आता जे तरुण आहेत, तेही उद्या वृद्ध होणार आहेत, त्यांनीही या विषयाची गांभिर्याने  दखल घेवून त्यांच्या पिढीतील लोकांचेही समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. तरुणपणाच्या पंखातल्या ताकदीने छाटलेल्या पंखानचा विचार करावा,कारण त्यांचेही पंख उद्या छाटले जाणारच आहेत! काळाचा विचार स्वार्थीपणा वाढावा हे सांगत नसून तो कमी करा हे सांगत आहे. आपल्या पालकांनी डोळ्यात प्राण आणून मुलांची वाट पाहत एकटे तडफडत मरायचे ही दृश्य  संवेदनशील मनाला माणसांच्या जगात राहतो तर माणूस कोठे आहे हा प्रश्न विचारतात.  

                     नुसता पैसा व भौतिक सुखे माणसाला खरे सुख देवू शकत नाहीत,त्यासाठी आपली माणसे,प्रेम याची निश्चित गरज असतेच!  भारतीय संस्कृतीचा कुटुंब  व्यवस्था हा मूळ पाया आहे. कृतज्ञता ही माणुसकीची  खुण आहे, कृतघ्न होवून आपल्याच जन्मदात्र्याना वार्यावर सोडणे, त्यांची काळजी न घेणे हे माणुसकीचे  लक्षणं  निश्चितच  नाही!  वैयक्तिक  स्वातन्त्र्याचा अतिरेक हा कुटुंब ,समाज व देशाची सर्व घडी विस्कटतो! आजच्या काळात जर  वृद्ध लीविंग इन रिलेशन शिप मध्ये  राहू लागले,तर आजी-आजोबा ही नाती संपुष्टात येतील.तरुण लीविंग इन रिलेशन मध्ये व म्हातारे ही याच रिलेशन मध्ये मग कुटुंब  संस्थाच संपुष्टात येईल!  आधीच एक-किंव्हा दोन मुले,त्या मुळे काका,मावशी ही नाती कमीच झाली आहेत. माणसाला जगण्यासाठी हे नाते सबंध आपुलकी चे असले,तर जगण्यास निश्चित आनंद मिळतो. एक-मेकानसाठी करण्यात व आपलेपणात जो आनंद आहे,तो दुसरा कशातही नाही! दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास,स्वतः साठी जगलास तर मेलास,हे खरेच आहे. 

                          आता मूले व मुली दोघेही आप-आपल्या आई-बाबानचे घर सोडत आहेत.  आप-आपल्या आई-वडिलांना स्वार्थासाठी वापरले जात आहे. ज्या मुलीनकडचे पालक अधिक मुलीच्या  घरात लक्ष घालतात,त्यांना हे उशिरा कळते,पण कळते निश्चित!   आई-वडिलांकडे पैसा व जमिन जुमला असेल,तर त्यांना त्यासाठी सुरुवातीस स्वार्थाने विचारपूस व नंतर त्या मालमत्तेसाठी भांडण हे करताना मात्र या पिढीला थोडीशीही लज्जा वाटत नाही, हे मी अनेक उदाहरणातून स्वतः पहिले आहे. बन गाया कुत्ता किंव्हा पप्पू कान्ट डान्स साला असें चित्रपट यांच्या कुत्तेपणाची खरी ओळख करून देतात. पुरूषार्थ  व स्त्रीत्व हरवलेली पिढी स्वातंत्र्याच्या अतिरेकाने बेपरवाह झाली आहे. स्वतःतील दोष शोधण्याची त्यांची क्षमताच  राहिलेली नाही,त्यांच्या बुद्धीवर पडदा पडलेला आहे. तो दूर करणे गरजेचे आहे. तारुण्यात गदे पंचविशी नाही तर गदे  ३५ शी ही झाली आहे तरी डोळे उघडत नाहीयेत! नुसत्या डिग्री व पैशांनी व स्वातंत्र्याने  येत नाही रे जिवन जगण्याची अक्कल,त्यासाठी निस्वार्थपणे , सहवेदनेच्या अनुभवाने ,कळते वात्सल्य व जिव्हाळ्यातून खरे प्रेम, तेव्हाच ज्ञानेश्वर व विठोबाला माऊली का म्हणतात हे उमजते बरे का!  जन्मदेत्या पृथ्वी,देश व मावूलीचा घ्या ध्यास,तेव्हाच उमजेल तुम्हा सर्वाना या जन्माच्या योजनेचा प्रवास! 

                      आता मुली सुशिक्षित व पायावर उभ्या राहिल्या की त्यांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या झाल्या आहेत. माझ्या आई वडिलांचे घर  का सोडावे? तूझ्या आई वडिलांना मी आपले का मानावे? मी  लग्ना नंतर नाव का बदलावे?  मूळ जन्माला  घालावे की नको,की दत्तक घ्यावे, लग्न करावे की लीविंग इन रिलेशन मध्ये रहावे, वेगळे रहावे  असें अनेक नविन प्रश्न कुटुंबाचे कुटुंबत्वच नाहीसे करीत आहेत. मुले आपल्या सोयीने पालकांना  गृहीत धरून,त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याचा गैर फायदा घेवून , आप-आपली जोडीदारीण अनेक वर्ष मैत्रीच्या नावाखाली घरात आणतात. पालकानच्या पैशात लग्ना सोहळा करून घेतात, वेगळ्या घराची सोय करण्याची क्षमता आली की  दूर होतात. काही जण मूल होई पर्यंत कसे बसे एकत्र राहतात,शाळेत जायला लागले की वेगळे होतात.  स्वतचे शिक्षण,स्वतःच्या मर्जीने जोडीदारा बरोबर लग्न न करता कितीही वर्षे राहणे व जेव्हा स्वातंत्र्यावर गदा येवू नये म्हणून दूर होणे ,याला स्वार्थ नाहीतर काय म्हणायचे? आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म देवून अस्तित्व दिले,तर त्यांनी त्या साठी तन-मन -धनाने केलेले संगोपन ,विसरून कसे चालेल? 

                             जरी पहिल्या पिढीने सुनांना मुलगी किंव्हा मैत्रिण  मानायचे ठरवले,तरी त्यांना ते ही नको आहे, कारण या मुलीचे नात्यात  ही कर्तव्य करावी लागतील की काय ही भीती.  नोकरी-व्यवसाय करीत असतील,तर भले समजूत दारीने स्वयंपाकास बाई ठेवली, किंव्हा सासू काम करीत असेल,तर त्याचेही महत्व जाणले हे व्हायला हवे,ते होत नाही. केले म्हणून काय झाले,असा सवाल असतो. आताच्या सासवानीही  अर्थार्जन करून कुटुंब सांभाळलेली आहेत,त्यामुळे त्यांना या गोष्टीचा निश्चित त्रास होतो. आज काल विकेंड पार्टी  इतर-परिवारा सोबत त्यांना घालवणे अधिक उचित वाटते. त्यांची प्रायव्हसी  व स्वातंत्र्याच्या   अतिरेकाची भूमिका समजूतदार पालकानाही दूर लोटत आहे. आपलेपणाची भावनाच नाही. त्या मुळे मूले आई-बाबा ना सोडून दूर जात आहेत,किंव्हा पालक दूर होत आहेत.  यामध्ये सासू-सून अनेक अपवादही आहेत.  एकूणच जनरेशन ग्याप खूप वाढली आहे. ज्यांनी आपल्या जिवनात स्वतःचा विचार  न करता आपले कुटुंब हाच विचार केला, त्यांना या परिस्थितीला तोंड द्यायला लागणे म्हणजे एक आघात आहे. परिस्थितीशी जुळवून स्वतःत बदल करा ,हे सांगणे खूप सोपे व प्रत्यक्ष फार अवघड आहे. आता आपली मुले एकदा पंख फुटल्यावर गेली की ती परततील का,आपल्याला त्यांच्या व त्यांच्या बाळांचा म्हणजेच नातवांचा  सहवास लाभेल का, हे सामान्य माणूस  अपेक्षा करतोच.  माणूस आहे,तो काही पाषाण नाही! 

                           सारेच  काही शून्यातून शून्यात लगेच जावून बसत नाहीत. त्यासाठी हे बळजबरीचे अध्यात्म आजची मुले पालकान वर लादत आहेत. एकटेपणाच्या तप्त वाळवंटात त्यांच्या जीवाची होरपळ होत आहे. त्याची दखल घेणारेही कोणी नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी समाज कार्य,त्यांचे छंद अनेक गोष्टीत मन रमवावे असें सांगतात ,पण हे सगळ्यांना शक्य असते का? शारीरिक व्याधींनी ग्रस्त झालेले,मानसिक खचलेले पालक त्यांना काय भाकड गाईन सारखे खाटिक खाने आहेत का रे? ते असते तर स्वत हून सुरी फिरवून घ्यायला नक्कीच तयार झाले असते! अरे त्यांना हवे आहे आपुलकी,प्रेमाचे शब्द ,दुसरे काहीही नको,दुसरे काहीही नको! 

           काळाचे सोबत स्वार्थाला घाला आवर, आपलेपणाची त्यावर लावा मोहर ! माणुसकी आणेल माणूसपणाला गहिवर , कुटुंब संस्था  व संस्कृती राज्य करेल जगावर!  
                                                                                                                                                                                                  मंगला