Monday, January 10, 2011

मुक्तीदिन आता विसरा, स्त्री-पुरुष मैत्री सशक्त करा!!!!!

                                      आज ३ जानेवारी ! सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्तीदिन ! आज त्यांच्यामुळे मी माझ्या अस्तित्वाचे पैलू जाणू शकले, त्या सावित्रीबाईना माझा प्रणाम ! स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या कल्पनान विषयी मी माझे मत व्यक्त करीत आहे.निसर्गदत्त स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे जन्मतःच मानवाला मिळाले आहे.
                                     स्त्रीच्या स्त्रीत्व हे तिचे मायेचे प्रतिक,माता,भगिनी,पत्नी,सासू,सून,अनेक भूमिकातून गृहिणी तत्वाने कुटुंब चालवणारी,कार्यक्षम,सहनशील,क्षमाशील,धैर्यवती,कर्तृत्ववान ,संस्कारांची खाण ,परोपकार,इत्यादी  आहे. काळा सोबत स्त्रीने तिच्यात अनेक कला-गुणांची उन्नती केली. स्त्री आणि पुरुष हे दोघेही एक-मेकांच्या हातात हात घेवून समानतेनेच प्रगती करू शकतात.
                                       स्त्री ही निर-निराळ्या नात्यांच्या कोंदणात हिऱ्या प्रमाणे शोभून दिसते. कोंदणा विना राहून स्वातंत्र्याच्या  अतिरेकी कल्पनांची नवी जिवन पद्धतीचा ती स्विकार करून खरया सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयोग परदेशातील स्त्रियांनी करून पहिले,म्हणून त्या सुखी झाल्या नाहीत,तर उलट कुटुंबाची वाताहत होवून बाल आणि वृद्ध यांना त्याचे चटके बसले आहेत.पाळणाघरे आणि वृद्धाश्रमांची संख्या दिवसेन-दिवस वाढत आहे.
                                       भारतीय संस्कृती प्रमाणे कुटुंब-पद्धती हा यशस्वी जिवनाचा प्रयोग सोडून, स्वातंत्र्याच्या भोंगळ कल्पनांच्या मागे धावणे चालू आहे. या मध्ये पुरुष हा स्वतःचा पुरूषार्थ गमावून बसल्या मुळे,षंढ समाज निर्माण झाला आहे. स्वधर्मा प्रमाणे स्त्री आणि पुरुष वागले,तर कोणत्याच समस्या उरणार नाहीत.स्त्री ने सुशिक्षित होणे म्हणजे तिच्या स्त्रीत्वाला प्रगल्भतेची धार देणे,व त्यातून तिने स्वतःचे ,मुलांचे व कुटुंबाचे हित साधणे व खरा माणूस घडवणे हे अपेक्षित आहे,असे मला वाटते. स्त्रीने स्त्रीची शत्रू न होता या वेग-वेगळ्या नात्यांचे मैत्रीत रुपांतर करायला हवे,तरच हा समाज सशक्त व सुखी ,आनंदी,समाधानी होईल.
                                      शिक्षणाने सु-संस्कृत होणे गरजेचे आहे,नुसतेच स्त्री-पुरुषांनी सुशिक्षित होवून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्या प्रमाणे,रुळलेली वाट  नको म्हणून नवी वाट तयार केली,चौकोनी कुटुंबाची सुरुवात केली,आणि त्यामुळे ते सुखी झालेही असतील,पण दुसऱ्यांना चटके देवून,याचे भान नाही! काही वर्षांनी हे उमजेल,पण परिस्थिती बिकट झालेली असेल. जसे आज कोणी कोणाचे ऐकत नाही,का? तर कुटुंबातच कोणी कोणाचे ऐकत नाही,तर बाहेर कसे ऐकणार ? आपल्या माता-पित्याला आपण पाहत नसू,तर समाज,देश यांचा विचारही शिवत नाही. कसा घडेल समाज?  प्रत्येकाने आपला स्वधर्म  पाळला तरच  समाज घडेल. मी हे समस्त मानव जाती साठी म्हणत आहे.
                                      सारे विश्व सुखं-समाधान आणि शांततेने नांदो! मी ही या जनता-जनार्दनाला तीच प्रार्थना रोज करते. 

No comments:

Post a Comment