Sunday, July 17, 2011

सुराज्याची घ्या शपथ, संचारू दे शिवबा प्रत्येकात!

 लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडत असताना आपण शांत राहावे, इतके आपण मृत झालो आहोत का? आपली मानसिक गुलामी नष्ट करा . देवाजवळ जातो आपण तर नमस्कार करताना त्याच्यातील  निर्मळता आपल्यात आहे का पहा. आताची  देशाची परिस्थिती पाहता डोक्यात एक विचार येवून गेला. असें वाटले सर्व जनता खरच सुराज्य साठी आसुसलेली आहे,तर काय बरं करायला हवे? प्रत्येकाने लहान मोठी लाच देणे घेणे केले आहे,त्यांनी सर्व हा काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा करावा. तेव्हा त्यांना गंगेत न्हावून पवित्र झाल्या सारखे वाटेल. प्रत्येकाने शपथ घ्यायला  हवी , मी आता पर्यंत ज्या चुका केल्या त्या परत करणार नाही,माझ्या देशाचे सुराज्य करण्यासाठी मी लाच देणार नाही व घेणार नाही. एकजूट होवून मग आंदोलन होवू शकते. जे ऐकणार नाहीत,ज्यांना  पाप क्षालन करायचे नाही त्यांना एकजुटीने धडा शिकवू शकतो. आता असें होते आहे की जो कोणी भ्रष्टाचार विरुद्ध बोलायला  जातो ,त्याच्याबद्दलच शंका घेतली जाते. त्या साठी प्रत्येकाने आपले व्यवहार स्वच्छ करा. कष्टकरी समाजाला  त्यांचा हक्क मिळवून द्यायला हवा,आपण चार आकडी पगार मिळवतो,त्यानाही मिळायला हवे. त्या शिवाय देशातील गरिबी नष्ट होणार नाही. सुजलाम सुफलाम देश तेव्हाच पाहायला मिळेल. करा आता पासूनच याची सुरुवात! घ्या सुराज्याची  शपथ! आपल्यात प्रत्येकात शिवाजी संचारायला हवा! त्या शिवाय हे सुराज्य होणे नाही! सुराज्याची घ्या शपथ, संचारू दे शिवबा प्रत्येकात! 

                                                                                                                                                                   मंगला